कविता

विरक्ती – शुभा रुद्र

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३५विषय क्रमांक: ३विषयाचे नाव: विरक्ती शब्दांकन: शुभा रुद्रपत्ता: पुणे संकेतस्थळ:https://instagram.com/shubharudra दुःखाचे मूळ आसक्तीथांबवावे हवेपणविरक्तीत नित्य शांतीउपाय तो रामबाण विरक्तीत समाधानपंचेंद्रिय नियंत्रणटिकवा अनुसंधानशाश्वत उपाय जाण करा चिंतन-मननसंतवाणी आचरणपरिवर्तन हे जीवनविरक्तीतून कल्याण भगवंत तो कृपाळूतोच व्यवस्था करीलठाम निश्चय करावाजीवन सार्थ होईल ✍🏻:- शुभा रुद्र

कविता

फिटे अंधाराचे जाळे – उल्का मानकर

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक : १३५विषय क्रमांक : २विषय : फिटे अंधाराचे जाळे शब्दांकन : उल्का मानकरपत्ता : नाशिककळले मलाही आतादुःखात जपलीस नातीआपलेच कबंध शरीरपुरण्या उपसलीस मातीका जाऊनी सखे गसयीत परतलीस रातीआपण एक होण्यासतू मिळवलीस ख्यातीलढण्या शत्रूसंगेशस्त्रे धरलीस हातीधारदार तलवारीचीचमकवलीस पातीफिटे अंधाराचे जाळेउजवळ्यास वाती✍🏻:- उल्का मानकर

कविता

विरक्ती – उल्का मानकर

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३५विषय क्रमांक : ३विषयाचे नाव : विरक्तीशब्दांकन : उल्का मानकरपत्ता : नाशिकल्यालो इथे मी आताविरक्ती ती सक्तीचीकटू योजना बघ त्याचीमज घरात डांबण्याचीओस पाडली शाळालुप्त झाला फळातंत्राचा लागे लळाविसरलो मैदानी खेळारोजच चिंता रोजच्या अन्नाचीसुटणाऱ्या बंदीच्या फर्मानाचीरस्त्यावर गर्दी फक्त मोकाटांचीवानवा दिसे लाचार नेत्यांचीभरडली सामान्य जनतामृत्युमुखी पडे बघता बघतायुती यमासवे पुढारी करतायमही वगळे त्यांसी… Continue reading विरक्ती – उल्का मानकर

कविता

फिटे अंधाराचे जाळे – परवीन कौसर

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३५विषय क्रमांक: २विषय: फिटे अंधाराचे जाळेशब्दांकन: परवीन कौसरफिटे अंधाराचे जाळेउंच आकाशी घेऊन झेपस्वप्न पूर्णत्वास नेणेहेच माझे एकमेव ध्येयकरूनी खुप काबाडकष्टशिक्षणाचा अंकुश ठेऊनप्रयत्नांची पराकाष्ठा करेनआई-बाबांचे आशिर्वाद घेऊनअपयशाने नाही खचलेपुन्हा जोमाने पुढे निघालेमाझ्या पदरी यश आलेस्वप्न माझे पूर्णत्वास आलेमेहनतीचे मिळाले फळतृप्त होऊन मन सुखावलेफिटले अंधाराचे हे जाळेआई-बाबांचे डोळे पाणावले✍🏻:- परवीन कौसर

कविता

विरक्ती – सौ. शोभा उर्फ सुजाता देशपांडे

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३५विषय क्रमांक: ३विषय: विरक्ती (कविता) शब्दांकन: सौ. शोभा उर्फ सुजाता देशपांडे पत्ता: औरंगाबाद संकेतस्थळ:https://instagram.com/shobha_deshpande_मोह, माया, पाश संसारी ठेवती बांधूनतृप्त केले सर्वां, कसे आनंदे रांधूनसमाधानी मन होती ही प्रवृत्ती वेळेवारी नोकरीतून घेतली निवृत्तीआता नाही कामाधामाची सक्तीयेवू दे हळूहळू मज ही विरक्तीकरिते गुजगोष्टी नातवंडासंगेमन माझे सध्या भजनात रंगेवळू लागली पाऊले पंढरीची वाटनको नशिबी… Continue reading विरक्ती – सौ. शोभा उर्फ सुजाता देशपांडे

कविता

फिटे अंधाराचे जाळे – अतुल दिवाकर

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३५विषय क्रमांक: २विषयाचे नाव: फिटे अंधाराचे जाळेशब्दांकन: अतुल दिवाकरपत्ता: पुणेसंकेतस्थळ: https://instagram.com/meetakd॥श्री॥फिटे अंधाराचे जाळेस्वच्छ होई जेव्हा मनदाट मेघ जाती दूरअन शांतता भरपूरलागे मुक्तिची मग आससुंदर प्रवास प्रवासकधी कुठे तो भेटेलचित्त कधी स्थिरावेलत्याची दूरी साहवेना जाणेल का तो भावनात्याच्या विरहात मनहोई उदास उदासमाझा सखा पांडुरंगनामजपात मी दंगमला बोलावून घे रेनको अंतर देऊ रेहाक… Continue reading फिटे अंधाराचे जाळे – अतुल दिवाकर

कविता

फिटे अंधाराचे जाळे – डॉ. अनघा घांग्रेकर

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३५विषय क्रमांक: २विषय: फिटे अंधाराचे जाळे (कविता) शब्दांकन: डॉ. अनघा घांग्रेकरपत्ता: डोंबिवली, ठाणेसंकेतस्थळ: http://www.instagram.com/doctoranaghaghangrekarफिटे अंधाराचे जाळेपडे लख्ख तो प्रकाशभानू लावता हजेरीजाई भरून आकाशजाई भरून आकाशमरगळ सारी जाईकिलबिल पाखरांचीदाणे टिपण्याची घाईदाणे टिपण्याची घाईथवे आकाशी निघतीआया बाया पाणीयासीझणी बावडीं रिघतीझणी बावडीं रिघतीख्याली खुशाली पुसतीखेळीमेळी ओसंडत दोन शब्द ते पुरतीदोन शब्द ते पुरतीलगबग ती… Continue reading फिटे अंधाराचे जाळे – डॉ. अनघा घांग्रेकर

Uncategorized

फिटे अंधाराचे जाळे – निशा थोरे

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३५विषय क्रमांक: ०२विषयाचे नाव: फिटे अंधाराचे जाळेशब्दांकन: निशा थोरेपत्ता: मुंबईसंकेतस्थळ: https://www.facebook.com/nisha.thore.1अष्टाक्षरीफिटे अंधाराचे जाळेरात्र सरली सरलीरंग केशरी लेवूनउषा रंगात रंगलीधुके रेशमी नेसूनआली नाचत पहाट ऊन कोवळे पिऊनउजळली दिशा वाट स्पर्श किरणांचा होताजाई जुई मोहरलीकिलबिल पाखरांचीआसमंती निनादलीसडा शिंपून दारातकशी रांगोळी रेखलीनक्षी दवबिंदुची तीपानोपानी हो सजलीफिटे अंधाराचे जाळेतुझी आठवण आलीगाणी ओल्या श्वासांची तीतुझ्यामाझ्या ओठी… Continue reading फिटे अंधाराचे जाळे – निशा थोरे

कविता

फिटे अंधाराचे जाळे – राधा गर्दे

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३५विषय क्रमांक: ०२विषय: फिटे अंधाराचे जाळे शब्दांकन: राधा गर्देसंकेत स्थळ:https://instagram.com/radhagardeमित्र धुक्यामागून हाजगां भेटण्यास जातांफिटे अंधाराचे जाळेरश्मि नाचे पक्षी गातांदवबिंदू हे अमृत पाना-पानांत दडलेनभी आदित्याचे हो त्याप्रेम उषेशी जडलेशुभ्र कापसी आकाशहाले-डुले हळूहळूमाळ श्वेत बगळ्यांची सवे चाले झुळूझुळूचराचर अवघे हे न्हाऊ चैतन्यात लागेमोट पाण्याची मळ्यात करीतसे शेतां जागेआर्त आरतीचे स्वरकापूराचा तो सुगंधभिरभिरे वाऱ्यासंगेमंद… Continue reading फिटे अंधाराचे जाळे – राधा गर्दे

कविता

फिटे अंधाराचे जाळे – विजयश्री तारे जोशी

रंग लेखणीचे परिवारआठवडा: १३५विषय क्रमांक: २विषय: फिटे अंधाराचे जाळे शब्दांकन: विजयश्री तारे जोशीपत्ता: कोल्हापूरसंकेत स्थळ:https://instagram.com/vijayshreetjoshi/फिटे अंधाराचे जाळेझुंजू मुंजू गगनातदैन्य उदास सरलेभरे चैतन्य तनातसोनफुले उधळीतदारी आले नारायणबळ देती जगण्यासलाल सोनेरी किरणकिलबिल पाखरांचीरानी वनी मोहरतीपाती तृणांची हिरवीदवी चिंब शहारतीकमलिनी जळी डोलेभृंग गुंजारव करेहंबरती रानी धेनूमागे धावती वासरेघंटानाद राउळीचाचंदनाचा तो सुगंधउरी भरून राहिलाउमेदीचा सूर गंधप्रकटले जगजेठीविश्वरुप ते झळाळेतोच… Continue reading फिटे अंधाराचे जाळे – विजयश्री तारे जोशी

कविता

वय कोवळे उन्हाचे – रुपाली जाधव

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक : १३४विषय क्रमांक : १विषयाचे नाव: वय कोवळे उन्हाचे (छंद मुक्त) शब्दांकन: रुपाली जाधव (सायरा)पत्ता : मुंबई संकेतस्थळ :- http://www.instagram.com/jadhav.rupalisara92प्रहराला जशी पालवी फुटतेतशी ऊब केशरी अंगणी उमटतेकोवळ्या उन्हाने चराचर फुलतेउश्यास येऊन अलवार फुंकरतेडोंगरा आडून किरणे हसती सावळी चादर अलवार ओढती कलिकांचा साज खळखळतोभरजरी शालू दवात परिमळतोहलक्या हलक्या काजळ काठीलुकलूकणारे स्पर्श उमटतीकोवळे… Continue reading वय कोवळे उन्हाचे – रुपाली जाधव

लेख

सिस्टिम; बोले तो…..! – ओमकार भोईर

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३४विषय क्रमांक: ३विषयाचे नाव: सिस्टिम; बोले तो.....!शब्दांकन: ओमकार भोईरपत्ता: वासिंद, ठाणेसंकेतस्थळ: https://instagram.com/krishn_rang_भारत हा विकसनशील देश आहे' हे सामाजिक शास्त्रातील वाक्य आजही तसेच आहे. दोन-तीन दशके उलटून सुद्धा भारत त्याच पातळीवर स्थिरावला आहे. यामागे विविध कारणे आहेत. आपली राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, शिक्षणव्यवस्था, रोजगाराच्या संधी आणि परिणामी आपले राहणीमान इत्यादींमुळे देशाचा विकास दर कमी… Continue reading सिस्टिम; बोले तो…..! – ओमकार भोईर

कविता

आभाळमाया – डॉ. अनघा घांग्रेकर

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३४विषय क्रमांक: ४विषय: आभाळमाया (कविता) शब्दांकन: डॉ. अनघा घांग्रेकरपत्ता: डोंबिवली, ठाणेसंकेतस्थळ: http://www.instagram.com/doctoranaghaghangrekarवृत्त: मंजुघोषालगावली: गालगागा ×3घातला त्या आठवांचा साज आतादाटली आभाळमाया आज आताआंदणी माझ्याच आले लाड सारेत्या सुखांची ऐकली मी गाज आतापाठिराखा होउनीया राहसी तूसांगण्या मी का धरावी लाज आतामोकळे आभाळ देसी गाठण्यालाना करी मी ना कधी रे माज आतावारसा माझ्यासवे मी… Continue reading आभाळमाया – डॉ. अनघा घांग्रेकर

कविता

आभाळमाया – विजयश्री तारे जोशी

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३४विषय क्रमांक: ४विषय: आभाळमाया (अष्टाक्षरी) शब्दांकन: विजयश्री तारे जोशीपत्ता: कोल्हापूरसंकेत स्थळ:https://instagram.com/vijayshreetjoshiबळीराजा बाप माझारोज खपतो शेतातपांडुरंगा आळवितपेरा करतो झोकातआकितीचा पेरा केलाबाप कामात दंगलाकर्ज फिटल शेताचंसपनात तो रंगलावादळाची आली वाटउन्मळून गेली केळखाली वर त्याचा जीवपाहे त्याचा न्यारा खेळखोपीचा तो उडे पत्रापाणी पाणी सारीकडेहात जोडत आकाशाबाप धावे गोठ्याकडेबसे तिथे गुरा पाशीआसू गाळतच राहीसरंना का… Continue reading आभाळमाया – विजयश्री तारे जोशी

लेख

रमजान ईद – डॉ. सौ. जयश्री लंगडे

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३४विषय क्रमांक : २विषयाचे नाव: रमजान ईदशब्दांकन: डॉ. सौ. जयश्री लंगडेपत्ता: ठाणेसंकेतस्थळ: https://www.instagram.com/dr.jayshree_langade/शीर्षक: आठवणींचा शिरकुंबा.साधारण १९७० साली माझे वडील डॉ.अर्जुन शिंदे उर्फ आबा मंगरूळ या गावी जनावरांचे डॉक्टर म्हणून नोकरीवर रुजू झाले होते. माझा जन्म मंगरूळ गावीच १९८१ साली झाला. मंगरूळ गाव तुळजापूर तालुक्यापासून साधारण १५ किलोमीटर अंतरावर वसलेले. त्या काळी… Continue reading रमजान ईद – डॉ. सौ. जयश्री लंगडे

लेख

परशुराम जयंती – राधा गर्दे

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक:१३४विषय क्रमांक:०२विषयाचे नाव: परशुराम जयंती शब्दांकन: राधा गर्देपत्ता: कोल्हापूरसंकेत स्थळ:https://instagram.com/radhagardeशीर्षक: परशुराम जयतु.अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषण:। कृप: परशुरामश्च सप्तैते चिरंजीविन:।।अश्वत्थामा, बलि, व्यास, हनुमान, विभीषण, कृपाचार्य आणि परशुराम ह्या सात चिरजीवांपैकी एक परशुराम. ह्यांच्या जयंती निमित्त त्यांच्या बद्दल आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करुया. परशुराम हे विष्णूचा सहावा अवतार आणि जमदग्नींचे चौथे पुत्र. काही ठिकाणी… Continue reading परशुराम जयंती – राधा गर्दे

कविता

अक्षय तृतिया (खानदेशी कविता) – प्रतिभा धामणे

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक:१३४विषय क्रमांक : २विषयाचे नाव : अक्षय तृतिया (खानदेशी कविता) शब्दांकन: प्रतिभा धामणे खानदेशनी गम्मत न्यारीआखाजी म्हणतस त्यालेलेकी बाळी येती माहेरलेसांजोऱ्या हमखास खावाले आखाजीना सण ऊनाहुरहुर जीवले लागेमाहेरले मना कोणीनिरोप का तो सांगे आखाजीना सण ऊनामाहेरना वाटे डोयेमना बापनी मी लाडीभाऊ धाडा माले मुये मना भाऊले पाहिसनीदेखे सासु मनकडेमना धनी नही… Continue reading अक्षय तृतिया (खानदेशी कविता) – प्रतिभा धामणे

लेख

रमजान ईद – योगेश गोगवेकर

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक : १३४विषय क्रमांक : २विषय : रमजान ईद ( लेख )शब्दांकन : योगेश गोगवेकरपत्ता : माहीम, मुंबईसंकेत स्थळ : https://yogeshgogwekar.blogspot.comमुस्लिम समाजात सर्वप्रथम दिवस साजरा केला जातो तो प्रेषित मुहंमद पैगंबरांचा वाढदिवस. त्याला मुस्लिम बांधव ईद-ए-मिलाद असे म्हणतात. पण हा काही त्यांचा सण नसून त्या दिवशी फक्त प्रेषितांचा वाढदिवस साजरा केला जातो. इस्लाममध्ये दोन सण फार… Continue reading रमजान ईद – योगेश गोगवेकर

लेख

अक्षय तृतीया – उल्का मानकर

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक : १३४विषय क्रमांक : २विषयाचे नाव : अक्षय तृतीयाशब्दांकन : उल्का मानकरपत्ता : नाशिकरामनवमी झाली की पुढच्या सणाचे म्हणजेच 'अक्षय तृतीयेचे' वेध लागतात. वैशाख तृतीयेला अक्षय तृतीय असते. 'अक्षय' म्हणजे क्षय न पावणारे किंवा नष्ट न होणारे. अशी ही अक्षय तृतीया. आपल्या कडे साडेतीन शुभ मुहूर्त आहेत. त्यात गुढीपाडवा, अक्षयतृतीया आणि… Continue reading अक्षय तृतीया – उल्का मानकर

लेख

परशुराम जयंती – योगेश गोगवेकर

रंग लेखणीचा परिवारआठवडा क्रमांक : १३४विषय क्रमांक : २विषय : परशुराम जयंती (लेख )शब्दांकन : योगेश गोगवेकरपत्ता : माहीम, मुंबईसंकेत स्थळ : https://yogeshgogwekar.blogspot.comमहाभारतात युद्ध सुरु होण्यापूर्वी अर्जुनाला कर्म योगाचे महत्व सांगताना भगवान श्रीकृष्णाने भगवतगीता सांगितली. तेव्हा एका श्लोकात उपदेश करताना श्रीकृष्ण सांगतात, "जेव्हा धर्माला ग्लानी येते, तेव्हा तेव्हा धर्मसंस्थापनेसाठी ईश्वर अवतार धारण करतो. तसे पूर्वी झाले… Continue reading परशुराम जयंती – योगेश गोगवेकर

कविता

वय कोवळे उन्हाचे – विजयश्री तारे जोशी

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३४विषय क्रमांक: १विषयाचे नाव: वय कोवळे उन्हाचे शब्दांकन: विजयश्री तारे जोशीपत्ता: कोल्हापूरसंकेतस्थळ:https://instagram.com/vijayshreetjoshiसांगू कशी तुला रे वय कोवळे ऊन्हाचेहितगुज लाजरे अन हिंदोळणे मनाचेवय वाढले तरी रे बाहुपाशी तीच ओढशिरशिरी फुलून अंगी हुरहूर तीच गोडहिरवाच शालू माझा निशिगंध माळलेलाकद जांभळा तुझा अन तो देखणाच शेला चैत्र यामिनीही होती निळ्या आभाळीचांदण्यावरी तरंग उठवी नवी… Continue reading वय कोवळे उन्हाचे – विजयश्री तारे जोशी

कविता

वय कोवळे उन्हाचे – उल्का मानकर

रंग लेखणीचे परिवारआठवडा : १३४विषय क्रमांक : १विषयाचे नाव : वय कोवळ्या उन्हाचेशब्दांकन : उल्का मानकरपत्ता : नाशिकउगवतीस सुरू होते गुपित किलबिलाचेकुणी सांगेल, वय कोवळ्या उन्हाचेपसरे आसमंती दरवळ नाना फुलांचेकुणी सांगेल, वय कुपितल्या अत्तराचेअवतरणे परत या अवनीवर बाष्पाचेकुणी सांगेल, वय पावसाच्या थेंबाचेअंधूक गारव्यात, विसावण्याऱ्या पाचूकणांचेकुणी सांगेल, वय चमकणाऱ्या दवबिंदूंचेघोंगावत स्वैर, स्वच्छंदी त्या फिरणाऱ्याचेकुणी सांगेल, वय… Continue reading वय कोवळे उन्हाचे – उल्का मानकर

लेख

रमजान ईद – परवीन कौसर

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३४विषय क्रमांक: २विषयाचे नाव: रमजान ईद ( लेख)लेखिका: परवीन कौसर. रमजान म्हटले की मुस्लिम बांधवांचे चेहरे अगदी उजळून निघतात. चेहऱ्यावर एक वेगळाच तजेलदारपणा येतो. सर्व मुस्लिम समाज या महीन्याची आतुरतेने वाट पाहत असतो. रमजान महिना हा मुस्लिमांचा पवित्र महीना आहे. या महीन्याची चाहूल शाबान महीन्यातच लागते. शाबान महीना म्हणजे रमजान महीन्याच्या… Continue reading रमजान ईद – परवीन कौसर

लेख

सिस्टीम; बोले तो….! – प्रतिक म्हात्रे

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३४विषय क्रमांक: ३विषयाचे नाव: सिस्टीम; बोले तो....!शब्दांकन: प्रतिक म्हात्रे.सिस्टीम, एक अशी गोष्ट जी बदलण्याचा कुणी जरा प्रयत्न केला, तर ती संपूर्ण सिस्टीमच त्याच्याविरोधात उभी राहते. वास्तविक पाहता सिस्टीम म्हणजे प्रत्येक क्षेत्रात सुव्यवस्था असावी म्हणून कार्यरत असलेली संघटना; पण काळानुसार तिच्यात बदलही आवश्यक असतो ह्याचा विचार करतच नाही कुणी आणि आपण मात्र… Continue reading सिस्टीम; बोले तो….! – प्रतिक म्हात्रे

कविता

जोगिया – सतिश कुलकर्णी

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३३विषय क्रमांक: १विषय: जोगियाशब्दांकन: सतिश कुलकर्णी इंस्टाग्राम पान: https://instagram.com/sn_kulkarni जाती : वंशमणि आज पुन्हांदा निजली होती सतारसैल पैंजणे पसरत धुंद अवतारहो तोच दिवस तीच तिथी अन् रजनीव्रतस्थ असता नाम तयाचे भजनी नव्हते पुसले नाव तयाचे मंगलमोहन म्हणता मनीमानसी दंगलपुनःपुन्हा त्या धुंडिले किती गावाश्याम मुरारी न दे आपुला ठावा वेडी मी तर… Continue reading जोगिया – सतिश कुलकर्णी