रंग लेखणीचे परिवारातील सदस्यांनी लिहिलेले सर्व लेख/कविता वाचण्यासाठी मेन्यू मधील लेख आणि कविता हे पर्याय निवडावेत.

रंग लेखणीचे परिवार
नवसाहित्यिकांचा मराठी मातीसाठीचा लेखाग्रह

माझ्या मराठीची गोडी
किती सांगू तरी थोडी
एक एक शब्द तिचा
दगडा पाझर फोडी

माझ्या मराठीचा ठसा
पावित्र्याचा तो वारसा
मराठ्यांच्या अस्मितेचा
तोच साक्षात आरसा

नमस्कार मंडळी

काळ बदलत चालला आहे, वाचन आणि लेखन कमी होत चालले आहे. विशेषतः आजच्या तरुणांना वाचनाचा तिटकारा आहे आणि म्हणूनच मराठी लेखक/वाचक जागृती हा हेतू डोळ्यासमोर ठेऊन रंग लेखणीचे परिवाराची निर्मिती करण्यात आली आहे.

रंग लेखणीचे परिवार हा व्हॉटसअप ग्रुप आहे. परिवारात दर आठवड्याला पाच विविधांगी श्रेणीनुसार पाच विविध विषय दिले जातात.त्यावर सर्व सदस्य व्यक्त होतात आणि ब्लॉगद्वारे त्या लिखाणाला इथं प्रसिद्धी दिली जाते!

आपलं स्वलिखित साहित्य आपण आपल्या परिवाराच्या बडबड ग्रुपवर सामायिक करू शकता. दररोज विविध उपक्रम राबवत साहित्य विषयक कार्य घडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो.

मराठी भाषेच्या सन्मानासाठी, प्रसारासाठी तसेच तिच्या स्वाभिमानासाठी आम्ही ही चळवळ आरंभली आहे. आपणही या चळवळीत सहभागी होऊन माय मराठीची सेवा करु शकता.

आपले सदैव सहर्ष स्वागत.

चला तर उधळूया रंग लेखणीचे!