Uncategorized

चेहऱ्यावर हसू आणणारा क्षण (भाग २)

10. रवि मिसाळ नवी मुंबई लिखाणाचा विषयच असा आहे की कितीही लिहिता येईल.आपण दिवसभरात असंख्य वेळा हसतो.मलापण दिवसभरात बरेच वेळा हसायची संधी मिळते.उदा अनपेक्षित पणे न मागता एखाद्या गाडी वाल्याने साईड देणे,क्रिकेट च्या सामन्यात रोहित ने षटकार मारणे,सिनेमातील एखादे कॉमेडी दृश्य असे दिवसभरात अनेक वेळा हसण्याची संधी मिळते. काही वर्षांपूर्वी 'दिल चाहता है ' नावाचा… Continue reading चेहऱ्यावर हसू आणणारा क्षण (भाग २)

Uncategorized

चेहऱ्यावर हसू आणणारा क्षण (भाग १)

1.रिता घणबहादूर (अकोला) आयुष्यात खूप गोष्टी घडतात. त्या कायम आठवणीत असतात. काही क्षण असतात, जे आयुष्य भरासाठी आपल्या चेहऱ्यावर हसू उमटवत असतात. माझ्याही बाबतीत असंच आहे. माझ्या आयुष्यातील तो क्षण, मी कधीच विसरू शकणार नाही. मी १२ ला असेल तेव्हाची गोष्ट. रोज सकाळी कॉलेज आणि नंतर शिकवणी वर्ग, माझं रोजच रूटीन ठरलेलं. सकाळी ७ ला… Continue reading चेहऱ्यावर हसू आणणारा क्षण (भाग १)

Uncategorized

सगळेच पुरुष नालायक असतात का ?

1. तुषार सुरेश पाटोळे (Sai) Instagram.com/shabd_tushar पुरुष कोणाचे वडील, कोणाचा भाऊ,कोणाचा नवरा,कोणाचा मित्र,तर कोणाचा प्रियकर ह्या असतात पुरुष तत्वाच्या पायऱ्या. हल्ली काही झालं की सहज आपण बोलून मोकळे होऊन जातो की अरे तो माणूसच न वाईट आहे,तो मुलगा न वाईट आहे, का तर तो चुकतो हो एकदा नाही खूपदा त्याच्या कडून चुका होतात आणि आपण… Continue reading सगळेच पुरुष नालायक असतात का ?

Uncategorized

नोकरी की व्यवसाय…

1. किशोर शेळके. लोणंद आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी चार रुपयांच्या मिळकतीच्या शोधात प्रत्येकाला धडपडावे लागते. प्रत्येक माणूस आपल्याला परीने कमवतो, त्यातून स्वतःची व स्वतःच्या परिवाराची गुजराण करीत असतो. पैसे कमावण्यासाठी व्यवसाय व नोकरी हे दोनच पर्याय आहेत. व्यवसाय करण्यासाठी भांडवलाची गरज असते ही अफवा अजूनही आबाधित आहे, आणि जोपर्यंत राहील तोपर्यंत तरी तरूण वर्गाचा… Continue reading नोकरी की व्यवसाय…

Uncategorized

घटस्फोटाचे वाढते प्रमाण

1. प्रतिक प्रवीण म्हात्रे विवाहबाह्य संबंध हे होणाऱ्या घटस्फोटांचं महत्वाचं कारण असूनही सर्वोच्च न्यायालयाने त्याला मान्यता देऊन सर्वसामान्यांच्या विचारांना जणू सुरुंगच लावला. तसं पाहायला गेलं तर अविवाहित किंवा विवाहित कोणतीही व्यक्ती तिच्यासोबत होणारी प्रतारणा खपवून घेऊ शकत नाही. अगदी आपल्या मैत्रिणीने किंवा मित्राने जरी आपल्यापेक्षा जास्त कोणाला महत्व दिलं तरीही इथे आकांडतांडव होतो तिथे विवाहबाह्य… Continue reading घटस्फोटाचे वाढते प्रमाण

Uncategorized

माझं मन (भाग २)

14. अजय जाधव, नाशिक Instagram.com/aj_the_ajay_jadhav रे मना काय लिहू तुझ्यावर, शब्द मनाने सुचवून काय लिहू मनावर, भाव मनाचे कसे मांडू कागदावर, तू अवखळ, अल्लड, मुक्त, स्वच्छंद, तुला कैद कसा करणार पानावर... माझं मन वेडं म्हणण्यापेक्षा वेंधळ म्हणणं सोयीस्कर पडेल याला. हलगर्जी पणा करण्यात पटाईत, कधी सांगितलेली गोष्ट याने केली असेल असं झालंच नाही. काही वेळा… Continue reading माझं मन (भाग २)

Uncategorized

माझं मन (भाग १)

1. दिलीप भुंजे, पनवेल ******* स्वप्नगंध ****** काल रात्रीला स्वप्नामध्ये स्वप्न पाहिले मी हळुवार त्या वाऱ्यासंगे डोल डोललो मी फुलांसोबत गंधासवे गंधित झालो मी कोसळणाऱ्या धारांमध्ये चिंब झालो मी गरजणाऱ्या ढगांसंगे मस्तीत रमलो मी चमचमणाऱ्या विजांसंगे तसा कडाडलो मी डोलणाऱ्या झाडांसोबत झुला झुललो मी फेसळणाऱ्या लाटांसोबत लहरत गेलो मी किलबिलणाऱ्या पक्षांसोबत गीत गायले मी इंद्रधनुच्या… Continue reading माझं मन (भाग १)

Uncategorized

आई बाबांचं महत्व…

1)तुषार सुरेश पाटोळे(Sai) नाशिक, आई बाबा या दोन शब्दांचं इतके महत्व आहे आपल्या आयुष्यात कि सांगता येणार नाही,कारण हे फक्त शब्द नाहीयेत तर आपले आयुष्य आहे. आई म्हणजे ती जिने फक्त जन्मचं नाही तर हे आयुष्य दिलं हे विश्व दाखवले,आणि बाबा ज्यांनी स्वतःच्या आयुष्याची झीज करून आपल्या आयुष्याला गती दिली असे आई बाबा. अगदी पहिल्या… Continue reading आई बाबांचं महत्व…

Uncategorized

मासिक पाळी -आजची आणि कालची परिस्थिती

1. नीरज शेळके अतिशय नाजूक असा हा विषय आहे, कारण कि या विषयवार अजूनही बरेच ठिकाणी बोलता येत नाही किंवा साधी चर्चाही होत नाही. तर मासिक पाळी ज्याला सगळेजण पीरिअड्स किंवा एम सी (मेन्स्ट्रुअल सायकल)म्हणतात ना हा विषय काही लोकांच्या बाबतीत खूप खाजगी असतो, तसेच काहीच लोक या विषयावर अगदी उघडपणे चर्चा करत असतात. काही… Continue reading मासिक पाळी -आजची आणि कालची परिस्थिती

Uncategorized

मी का लिहिते/लिहितो (भाग २)

13. प्रज्ञा हरिश्चंद्र नाईक.. (निरामयी) आंबोली... मी का लिहीते? कशासाठी लिहीते? कोणासाठी लिहीते? मला माहीत नाही... हा छंद मला कसा लागला देव जाणे... मला बोलायला खूप आवडतं पण ऐकून घेणारंच कुणी नसतं... मग मनाचाच मनाशी संवाद करतं बसते. तिथे प्रश्न माझेच असतात आणि उत्तरही माझीचं... तिथे ना हेवेदावे, ना मतभेद, फक्त नि फक्त समाधान. या… Continue reading मी का लिहिते/लिहितो (भाग २)

Uncategorized

मी का लिहीतो/लिहीते (भाग १)

1. दिलीप भुंजे. वाचताना किंवा ऐकताना जाणवेल आपणास जवळीक मनात कुठेतरी खोलवर हळुवार स्पर्श करणारी निश्चितच जाणवेल कुठेतरी अनुभुती माझ्या भावनांची सुरात तुमच्या सुर मिसळून हळुवार रंगणाऱ्या मैफिलीची कविता फक्त कविताच नसते ती असते एक संवाद तुमच्या व माझ्या मनामधला उमलणारा एकच नाद माझी कविता नाही, आपली कविता भावनांची व्याप्ती खुपच दूर सुरेल वाद्यांच्या मैफिलीतुन… Continue reading मी का लिहीतो/लिहीते (भाग १)

Uncategorized

व्यसनांची वाढती फॅशन…!!

1). ©स्मिता जोशी. पुणे सहजच रात्री जेवणानंतर गॅलरीत येऊन थांबले आणि समोर जेमतेम सोळा सतरा वर्षांची मुल अगदि सहजगत्या सिगारेट अोढताना दिसली. पहिल्यांदा खुप राग आला मनातल्या मनात त्यांना, त्यांच्यावर योग्य ते संस्कार करु न शकलेल्या आईबापाला दोन चार शिव्या घातल्या. परंतु दुसर्‍याच क्षणाला त्यांची किवदेखील आली. आपल्या सुंदर आयुष्यातील अगदी महत्त्वाच्या असणार्‍या टप्प्यावर हि… Continue reading व्यसनांची वाढती फॅशन…!!

Uncategorized

मैत्रीच्या विश्वात…

1) प्रतिक प्रवीण म्हात्रे फावल्या वेळात फेसबुक स्क्रोल करत असताना सम्राटने अन्याने म्हणजेच अनिकेतने त्याच्या ऑफिसच्या मित्रांबरोबर केलेल्या ट्रिपचे फोटो पाहिले आणि पुन्हा त्याचं मन कॉलेजच्या जुन्या आठवणीत रमलं. कॉलेजची त्याची गॅंग…तो, अनिकेत, शर्वरी, सुशांत, तन्वी, मनीषा ध्रुव.. शनिवारची अगदी आतुरतेने वाट पाहत असायचे सगळे जण.. शनिवारी कॉलेज आणि extra लेक्चरच्या नावाखाली अख्खी मुंबई फिरून… Continue reading मैत्रीच्या विश्वात…

Uncategorized

माझ्या स्वप्नातला भारत

1). अजय जाधव, (नाशिक) अरे सोन्या उठ शाळेत नाही जायचं का तुला? किती उशीर झालाय बघ! उठ पटकन आवरायला घे! सकाळी सकाळी गाढ झोपेत असताना आईचा आवाज कानावर पडला. मी शाळा कधी चुकवत नाही पण आज शाळेत नाही जायचं अस ठरवलं होतं म्हणून जग आलेली असताना ही मी बिछान्यावर पडून होतो. काल आमच्या सरांनी 'माझ्या… Continue reading माझ्या स्वप्नातला भारत

Uncategorized

तुझे आहे तुजपाशी परी तु जागा चुकलासी

1).किरण पवार. (औरंगाबाद) निर्णय बरोबर असतात पण इतरांना सांगायची हिम्मत होत नाही. किंवा मनात ठरलेलं असतं कुठे जायचयं पण रस्ता अंधुकच माहित असतो. पूर्णपणे कल्पना येत नाही. आपल्याजवळ असलेलं ज्ञान, कला अथवा इतर गोष्टी असतील त्या परिपूर्ण असतात. पण कुठेतरी काहीतरी अपूर्ण वाटत असतं. किंवा आपला अंधुक मार्ग चुकीच्या वेगाने चालू असतो. जी गोष्ट आपल्याला… Continue reading तुझे आहे तुजपाशी परी तु जागा चुकलासी

Uncategorized

— अवनी एक वाघीण

1. श्रीकांत कांबळे ---------------- मी एक वाघीण. मी हि ह्या अवनी वर राहणारा सजीव एक प्राणी. मी नरभक्षक वाघीण म्हणजेच अवनी हे नाव तुम्हीच दिलेलं नाव. तुमच्या सर्वांच्या मते, मी 14 जणांचा बळी घेतला आहे.. पण मी बळी घेतला नसून, मी माझी भूक शमवली आहे.. कारण हा काही माझा गुन्हा नाहीये. आणि मी काही नियतीच्या… Continue reading — अवनी एक वाघीण

Uncategorized

आयुष्यात राहून गेलेलं (भाग ३)

31. श्रुतिका बिडगर, अहमदनगर माझा जन्म झाला आणि काहीच दिवसांत आईला नोकरी मिळाली, परतुं मला सांभाळण्यासाठी कोणी नसल्यामुळे माझी रवानगी आजोळी करण्यात आली. त्यामुळे माझं संपूर्ण बालपण हे आजोबांच्या कणखर शिस्तीत आणि आजीच्या संस्कारामध्ये गेलं. त्याच जोडीला खोडकर मामा आणि मावशीसोबत ! यादरम्यान, मला एक छोटा भाऊ झाला. पण मला याची भणक माञ ,जेव्हा मी-माझं… Continue reading आयुष्यात राहून गेलेलं (भाग ३)

Uncategorized

आयुष्यात राहून गेलेलं (भाग २)

15 . किरण पवार (निनावी), औरंगाबाद. "बापाला मनातून बाप म्हणून स्विकारणं राहून गेलयं", कदाचीत वाईट वाटेल अथवा राग येईल पण हे सत्ययं. मला कुणी एखाद्याने बाप शब्दाची स्तुती जरी केली ना तरी राग येतो हां. कारण बापाने जन्म देण्याव्यतिरीक्त आजवर केवळ बोळवणंच केली जबरदस्तीची. मी आज एक उत्कृष्ट खेळाडू असू शकलो असतो; ही खंतही कधीतरी… Continue reading आयुष्यात राहून गेलेलं (भाग २)

लेख

आयुष्यात राहून गेलेलं (भाग १)

1. श्री.दिलीप भुंजे, पनवेल. संकल्प वर्ष संपत आले, काही हिशोब मांडील म्हणतो घेणी सर्व विसरून जाईल, देणी सर्व देईल म्हणतो गाणी बरीच गायची राहिली, नवे साथीदार शोधिल म्हणतो विखरलेले स्वर सारे, सुंदर रचनेेत बांधिल म्हणतो बेरंग झालेले आयुष्य, सुंदर रंगात रंगविल म्हणतो गोळा केलेत सारेच रंग, चित्र सुंदर काढिल म्हणतो दूर गेलेल्या सा-यांनाच, एकत्र गोळा… Continue reading आयुष्यात राहून गेलेलं (भाग १)

लेख

हरवत चाललेलं आयुष्य…

1. तुषार सुरेश पाटोळे (Sai), नाशिक पहिले कसं होतं मोबाईल फोन्स, इंटरनेट, सोशल मीडिया, टेलिव्हिजन या सारख्या गोष्टी उपलब्ध नव्हत्या, त्यामुळे माणसांमध्ये बोलणं समोरासमोर व्हायचे. सगळी अशी म्हणजे पंगत बसायची, विचारांची, एकमेकांच्या मतांची देवाणघेवाण स्पष्टपणे होत असायची आणि ते आयुष्य खरं जगणं होतं. लांबच्या नातेवाईकांना काही बोलावंसं वाटलं की ते गावी यायचे, छान बोलणं बसणं… Continue reading हरवत चाललेलं आयुष्य…

लेख

माझी रोजची प्रेरणा

1. सुबोध सराफ अतिशय आवडणारा विषय....प्रेरणा हा शब्दच प्रेरणादायी आहे...खर तर प्रेरणा अगदी कुठूनही मिळू शकते ...लहानग्याच्या नैराजस हास्यातूनही मिळते ...आणि ते थेट हिटलरच्या आत्मचरित्रातूनही मिळतेच....आपण ठरवायचय कि आपणास नक्की काय हव आहे ते...एक प्रसंग मला कायम आठवतो ...अर्थात काॅलेज मध्ये असतांना..घडलेला ...तेव्हा आता सारखी चकचकीत मल्टीप्लेक्स थिएटर नव्हती....सिंगल स्क्रीन टाॅकिज असायच्या तिकिटांच्या साठी हे… Continue reading माझी रोजची प्रेरणा

लेख

सार्वजनिक ठिकाणी तरुणाईचे चाळे

1. उषाअरविंद (वर्षा अरविंद शिन्दे) अनेक अवस्था मधून उत्क्रांत होत गेलेला माणूस, मग त्याने त्याला सुखकर अशी जीवनशैली निर्माण केली. तिला अनेक नावं दिली गेली.. हे करताना कुणाला सामाजिक , कुणाला वैयक्तिक स्वातंत्र्य महत्वाचं वाटलं, आणि कुणाला त्याचा अर्थच नीटसा न समजल्याने गोंधळ उडाला आहे. कुठेही , कसेही वागणे , मनाला येईल ते करणे आणि… Continue reading सार्वजनिक ठिकाणी तरुणाईचे चाळे

लेख

आत्महत्या : एक पळवाट?!

1. निखिल चव्हाण होय .. आत्महत्या एक पळवाट च आहे . सुखाच्या शोधात निघालेली. ती एक पळवाट आहे माणसाचं दुःख क्षणात दूर करणारी. ती पळवाट आहे निपचित पडलेली . जगाला त्या वाटेत काटे दिसतात पण त्या वाटेवर चालणाऱ्याला मात्र मोहवतो तिथला मोगरा ,जसवंद , गुलाब आणि अलगद दूर होतात त्याच्या आयुष्यातील काटे . जेव्हा माणसाला… Continue reading आत्महत्या : एक पळवाट?!

लेख

आजचं प्रेम स्वार्थी आहे का?

1. अनिकेत जोशी, पुणे मला असं वाटतं, जिथं स्वार्थ असेल तिथे प्रेम असूच शकत नाही. प्रेम ही अतिशय पवित्र भावना आहे. प्रेम हे माणसाच्या जगण्यातील प्रमुख सूत्र आहे . हा आता आजकाल आपण जर ही अशी भावना जर कुठल्याही एककात मोजायला लागलो तर खरा अर्थच कळला नसेल कदाचित प्रेमाचा किंवा मूळ संकल्पने मध्ये काहीतरी गफलत… Continue reading आजचं प्रेम स्वार्थी आहे का?

कविता · लेख

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं?

1. अनिकेत जोशी "काय रे देवा ... " आता परत मी हॉस्टेलला निघणार सोबत नेहमीप्रमाणे मोठ्ठी बॅग असणार स्टॅण्डवर जायला मी रिक्षा शोधणार सूर्य नेमकं तेव्हा आग ओकत असणार अशात एक तुडुंब कोंबलेली रिक्षा येताना दिसणार अगडबंब देहाला कसाबसा रिक्षात कोंबणार पण कुणाला त्याचं काहीच नसणार... काय रे देवा ... स्टॅण्डवर नेहमीप्रमाणे माझी गाडी चुकलेली… Continue reading प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं?