चेतन जोग(पुणे)
इन्स्टाग्राम आयडी :- http://www.instagram.com/chetan_jog1992
लेख/कविता :- लेख

प्रत्येक प्रसंगात सर्व बाजू समजून घ्यायला हव्यात.
दिवसाची सुरुवात सकाळच्या चहा ने होते. या वेळी चहा आणि हातात ताजे वर्तमानपत्र असल्यावर एक वेगळीच मजा येते. काही जण अशा वेळी चाय पे चर्चा असा कार्यक्रम करतात. या वेळी साधेसे कारण देखील चर्चा करण्यास चालते. रविवार चा दिवस होता. सकाळी ८ वाजता घरातील सगळे सभासद एकत्रित पणे चहा साठी जमले होते. त्या वेळी घरातील मुलीने शांतता भंग केला.
ती म्हणाली,” बाबा, कॉलेज मधील एक मुलगा सतत माझ्या मागावर आहे. मी उद्या पासून कॉलेज ला जाणार नाही. ”
” कोण आहे तो ?”
” मी त्याचे नाव सांगितले तर उद्या मलाच त्रास होईल. ”
” काही होणार नाही, तू बिनधास्त सांग. मी आहे ना ! ”
वरील प्रसंगात मुलीने कथन केलेली हकीकत थोडक्यात अशी होती :-
शहरातील एका नामांकित कॉलेज मध्ये इंजिनियरिंग चे शिक्षण घेत असताना तिचीे अक्षय नामक मुलाशी ओळख झाली. ओळख ही तेवढीच न राहता ती मैत्री मध्ये कधी बदलली हे तिला देखील कळले नाही. इतकेच नाही तर ती मैत्री इतकी घट्ट झाली की आता एकमेकांना त्यांच्याशिवाय दुसरे सुचत नव्हते. कॉलेज चे जीवन हेच मुक्तपणे जगण्याचे असल्याने मैत्रीपूर्ण संबंधात वासना कधी शिरली हे तिला कळलेच नाही. आधीच सुंदर आणि देखणी असलेली ती त्याच्या आग्रहाखातर वेगवेगळे कपडे परिधान करू लागली. पण ते कपडे परिधान करताना त्याचा परिणाम आपल्याला पुढे काय होईल याचा विचार केला नाही. अशातच एके दिवशी भर दुपारी घरी येत असताना त्याने त्याच्या मित्रांच्या समोर तिची छेड काढली. ती मदतीसाठी त्याच्याकडे बघत असताना त्याने विकट हसत नकार दिला. कसेबसे त्यांच्या तावडीतून सुटून ती घरी आली आणि तडक आपल्या बेडरूम मध्ये जाऊन अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
तर वरील प्रसंग पाहून तिच्या वडिलांनी तिला विचारले,” त्याच्याविषयी तुला काय माहीत आहे ? ”
” काहीच नाही, कारण त्याने देखील कधी सांगितले नाही आणि मी देखील विचारले नाही ”
” इथेच आपण चुकतो, ज्या मुलाशी आपण मैत्री करतोय त्यांच्याबाबत मोजकी पण महत्वाची माहिती तुला माहीत असायला हवी होती.”
” खरंच सॉरी बाबा…माझं चुकलं ! ”
” असे नाही बेटा, तुझ्या बाजूनेच विचार करून निर्णय दिला तर तो एकतर्फी निर्णय होईल. त्यामुळे समोरील बाजू देखील समजून घेतली पाहिजे. ”
” म्हणजे काय बाबा ? ”
” म्हणजे अस बघ, त्याला तुझी छेड काढावी असे का वाटले ? तर तू त्याच्यासोबत जो काही वेळ होतीस तेव्हा तू परिधान केलेले कपडे हे उत्तेजना दर्शक होते. चालणे आणि वागणूक ही देखील तशी होती. त्यामुळे नकळत तू त्याच्या वासनेला चालना दिलीस. ”
” ओह्ह…हे तर मी विसरलेच होते ! ”
” हो ना !! मग उद्यापासून नीट व्यवस्थित कपडे घालून कॉलेज ला जा आणि मन लावून अभ्यास कर.. कोणाचीही मैत्री स्वीकारताना त्याची पूर्ण माहिती काढून मगच मैत्रीचा हात स्वीकार. पुन्हा असे काही होणार नाही याकडे लक्ष दे. ”
अशा प्रकारे दोन्ही बाजू विचारात घेतल्यामुळे तिचे शैक्षणिक आणि पुढील सर्व आयुष्य सुरळीत झाले. म्हणून तात्पर्य हेच की एकतर्फी निर्णय कधीही धोकादायक ठरतो…त्यामुळे प्रसंगाचा दोन्ही बाजूने विचार करावा आणि मग निर्णय घ्यावा.

