लेखिका : पल्लवी राणे.
मुंबई.
प्रत्येक प्रसंगात सर्व बाजू समजून घायला हव्यात!

आयुष्य म्हणजे कसं अनेक प्रसंगाचा,घडामोडींचा ,चांगल्या वाईट एक संच असतो . काही प्रसंग आठवणीतले तर काही मनाच्या तळघरात साठलेले असतात . कधी,कुठे,काय प्रसंग ओढवेल ते सांगता येत नाही कारण ते सो कॉल्ड नशिबावर अवलंबून असतं .काहीतरी प्रसंग घडतो मग त्यात काही व्यक्ती समाविष्ट,काही कर्ते तर काही बघ्याची भूमिका घेणारे.
आपल्याकडे ना अनुमान पटकन लावल जात,आता म्हणाल कसं??समजा,कोणाचा अपघात झाला तर ते प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेल्याना आणि ज्याचं झालं त्याला हे दोन दुवे सोडले तर सत्य काय हे कोणालाच माहीत नसतं,मग तो योगायोग जुळून आलेला अपघात त्यात ड्रायव्हर ची चूक व इतर अनेक शिक्के त्यावर लावले जातात. लोक फक्त घटना बघतात आणि अनुमान लावून बरळत बसतात .पण मग त्या मागच्या बाजू , कारण किंवा मग आपण कितीश्या बाजू पारखून पहिल्या हे काहीच पाहत नाहीत फक्त निर्विकार पणे पाहून मत मांडून मोकळे होतात.
आणि मग तिसर्याला सांगताना स्वतःच्या निर्विकार बुद्धीला जे पटलंय तेच सांगतात . आपल्या रोजच्या वापरातील नाण्याला सुद्धा फक्त दोनच बाजू अस आपण मानतो,पण त्याच्या इतर ही बाजू असतात. हा,आता आपल्याला शिकवल्या प्रमाणे “नाण्याच्या दोन बाजू” म्हणून आपण इतर बाजू इग्नोर करतो. सिंहाला सिद्ध तीनच बाजू हा आपल्याला दिसतात आणि मग आपण तरच डोक्यात फिट करतो,पण त्याची ती चौथी बाजू सहजरित्या दुर्लक्षित होते
आजकाल आपल्या ह्या पिढीत ते ब्रेकअप वैगरे असल्या गोष्टी बऱ्याच चालतात .दोन जीवांमधला संवाद संपला,गरजा भागल्या , इगो ला ठेच लागली किंवा तसच काही कारण असल्यावर ब्रेकअप होतो . दोन जीव जे “मी तुझ्याशिवाय जगू शकणार नाही”असं म्हणणारे ब्रेकअप झाल्यावर गुपचूप घरी जाऊन सगळं दिनक्रम करतात.
अर्थात सगळेच कठोर मनाचे असतात असं मी म्हणणार नाही,पण मग काही सावरतात,काही नाही सावरत .पण मग आता ह्यात जे झालं असेल त्यात दोघांची पण बाजू असणार जर मुलगी म्हणत असेल की चूक त्याची होती तर मग तिने त्याची बाजू सुद्धा समजून घ्यायला हवी आणि vice-versa.
आपण ना दृष्टिकोन ठेवण्यातच चुकतोय मुळात,कुठल्याही प्रसंगाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहावं हेच आपल्याला कळत नाही. आपण वेगळ्याच विचारांचं वादळ आपण आपल्या बुद्धीवर आणि मनावर लादतो,आणि कोणतेही आढेवेढे न घेता ,पडताळणी न करता त्यावर मत मांडून जातो बरोबर ना??
कधी विचार केलात एखाद्या मुलीचा बलात्कार होतो तेव्हा तिची काय अवस्था होत असेल. बलात्कार करणारा पुरुष असतो तरीही दूषित मुलगी मानली जाते. तिला जगण्याचा अधिकार नाही हे ती आत्महत्या करेपर्यंत तिच्या मनावर गोंदवतो आणि मग अखेर हार मानून ती सुटकेचा श्वास सोडते. मला एक सांगा वासना समोरच्याची , सगळं केलं त्यांनी मग दूषित तो व्हायला हवा, समाज्याने त्याला हिनवायला हवं पण तसं होत नाही का?? तर तो पुरुषार्थ ना अरे ही असली बुरसटलेलेली विचारसरणी तुम्ही स्वतः सकट जाळून का नाही टाकत?
आता मी हे सगळं एवढं परखड बोलतेय म्हणजे असा प्रसंग कुठेतरी पाहिलेला , वाचलेला असणार हा विचार ७५% लोकांच्या मनात डोकावला असणार..त्यांच्यावर हसावं की रडावं तेच कळत नाही.. आज काही बाबतीत अभिमान वाटावा असा आपला देश आहे पण ह्या काही बुरसटलेल्या विचारांमुळे मागे पडत चाललाय , पण हे तुम्हाला समजवणार कोण? आणि तुम्ही तुमची अक्कल नको तिकडे पाजळायची ठरवलेच असेल तर त्याला कोण काय करणार??
जर तुम्ही फक्त ठरलेल्याच बाजू बघायच्या ठरवल्या असतील तर धन्य आहात तुम्ही. देव तुमचं भलं करो.उद्या तुमच्यावर काही प्रसंग आला तर समोरचा ही एकाच बाजूने विचार करणारा असावा ही सदिच्छा.कटू बोलतेय ना पण जे आहे तेच बोलतेय अस व्हायला हवं तरच तुम्हाला कळेल..
जरा स्वतःच्या आधी समोरच्याचा विचार काही प्रसंगात करायला शिका. एखादा प्रसंग घडला किंवा कानावर पडला तर तर एकाच बाजूला “हेच सत्य” अस मानू नका. पडताळणी करा,तुमच्या मनाला , बुद्धीला पटतंय का बघा आणि मग ठरवा.. बाकी तुम्ही हुशार आहातच..जय हिंद
®©पल्लवी राणे📝

