
पियुष उबाळे. औरंगाबाद
https://instagram.com/piyushubale?utm_source=ig_profile_share&igshid=1celwo7ggv9bw
!
रिकामा खिसा हा विषय खुप मनाला हळहळ व्यक्त करायला लावणारा आहे कधीकाळी किंवा कधीतरी आपल्यातील काही लोकांना रिकामा खिसा घेऊन समाजातवावरण्याची वेळ आली असेल किंवा येईलसुद्धा जेंव्हा आपला खिसा रिकामा असतो तेंव्हा आपल्यासमोर असलेली प्रत्येक गोष्ट ही आपल्याला एखाद्या पुतल्याप्रमाणे भरायला लागते खरंतर मी हा विषय का सुचवला? हा विषय सुचवण्यामागचे माझे कारण काय? असा जर प्रश्न कोणाला पडत असेल तर त्या प्रश्नाचे उत्तर मी या लेखाद्वारे देतोय,हा विषय सुचवण्यामागचे एकमेव कारण म्हणजे रस्त्यावर भटकणाऱ्या त्या आजी वयाने अतिवृद्ध अंगात चालायचे बळ नाही आणि पोटाची खळगी भरून काढण्यासाठी खिशात (बटव्यात) काहीच नाही अर्थात रिकामा खिसा त्यांच्यासोबत घालवलेला थोडा वेळ त्यांचे जाणून घेतलेलं दुःख याबद्दल हळहळ वाटत आहे म्हणुन मांडतोय थोडं त्यांच्याबद्दल.
प्रत्येक शहरामद्धे आपल्याला अशी लोक भटकंती करताना पाहिलं असेल जे जे मोठी मोठी शहर आहेत त्या ठिकाणी अश्या लोकांचं प्रमाण खुप आढळून येईल तसेच मला या आजी घरापासुन थोडं लांब भेटल्या त्यांना पाहिल्यानंतर मला रडु आवरलं नाही म्हणुन मी त्यांना काही बोलण्याचा प्रयत्न केला मी त्यांना बोलण्याचा प्रयत्न केला मी त्यांना विचारपुस केली असता त्यांनी सांगण्यास सुरवात केली असता त्यानी सांगितलं मला तीन मुलं आहेत पण त्यातलं एकही मुल माझा सांभाळ करण्यासाठी तयार नाही म्हणुन ही परिस्थिती आज माझ्यावर ओढावली आहे आणि त्या अश्रू गाळू लागल्या माझ्या समोर मी त्यांना जास्त दुःख वाटु नये यासाठी त्यांना एक हॉटेल मद्धे घेऊन गेलो तिथे गेल्यानंतर मी त्यांच्या साठी चहा मागवला कारण खुप थंडी होती त्यांचा चहा पिऊन झाल्यानंतर त्या मला म्हणु लागल्या की बाळा मला खुप भूक लागली आहे मला जास्त नाही दहा रुपये दे मी खाईल काहीतरी मी त्यांना म्हनलं हे बघा आजी तुम्ही माझ्या आजी सारखे आहात तुम्हाला हवं ते मागवा मी बिल देतो त्यांनतर त्यांनी एक फुलाव मागवला मी म्हनलं त्यांना बस की अजून काही हवंय का?त्यावर त्या स्मित हास्य करत म्हणाल्या काही नको हे मला तीन ते चार दिवस आधार देईल त्या जेवण करीत असताना मला सांगत होत्या की तिन्ही मुलं मला दररोज हाणामारी करतात व मध्यपान म्हणजेच दारु पिण्यासाठी पैश्याची मागणी करतात मी कुठून देणार त्यांना पैसे उलट त्यांनी माझा सांभाळ करायला हवा पण ते सुख आमच्या नशिबात नाही.
मी म्हणालो तुम्ही त्यांना जन्म दिला हा तुमचा दोष नाही पण तुमच्या मुलांनी एका आईच ह्रदय काय असत हे अनुभवलं नाही तसेच आईच मातृत्व त्यांच्या नशिबी नाही बर मला सांगा बघू की तुम्ही घर कधी सोडलं म्हणजे तुम्ही घरातुन बाहेर कधी पडलात त्यावर त्या म्हणू लागल्या मी स्वतःहुन नाही निघाले माझ्या धाकल्या सुणेन मला धक्के मारत घराच्या बाहेर काढलं तेंव्हा पासुन मी प्रत्येक दिवस मोजत आहे आज मला घराच्या बाहेर पडून चार वर्ष एक महिना झाला.
तेंव्हापासून मी बसस्टँड वर माझं वास्तव्य करत आहे मला अश्रू अनावर होत नव्हते मी त्यावर त्यांना म्हणालो इथे एक जवळपास वृद्धाश्रम आहे तिथे मी तुमची व्यवस्था करतो कारण तिथे तुम्हाला ऊन वारा पाऊस व थंडी पासुन स्वतःचे रक्षण करता येईल आणि वेळोवेळी औषध उपचार पण करता येईल आणि एक स्वछ व आंनदी जीवन जगता येईल. इतके बोलुन झालं आणि मी त्यांना सुखरूप त्यांच्या रोजच्या ठिकाणी नेऊन सोडलं आता तुम्हा सर्वांना प्रश्न नक्की पडला असेल मी त्यांची वृद्धाश्रमात का व्यवस्था नाही केली? याच उत्तर तुम्हाला मी सांगेल जो पर्यंत त्यांचा होकार मिळत नाही तो पर्यंत मी त्यांना वृद्धाश्रमात नाही सोडणार पण एक सांगतो मी त्यांना रोज एक टाईमाचे जेवण देतो कारण मी माणुसकी खुप जपतो आणि ते माझ्या आईचे संस्कार आहेत
जर तुमच्याही आजूबाजूला किंवा इतर कुठेही असे व्यक्ती आढळून आले तर त्यांना एक चहा पाजून बघा तुम्हाला किती आंनद मिळेल आणि त्यांच्या चेहऱ्यावर किती सुख असेल.
जर लेख आवडला असेल तर नक्की कळवा आणि करा सुरवात एका चांगल्या कामाला.
धन्यवाद!
©पियुष उबाळे


👌👌👌👌
LikeLike
🙌🙌
LikeLike