रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक: १३९विषय क्रमांक: ४विषय: आणि, चंद्र ओशाळतो (कविता) शब्दांकन: डॉ. अनघा घांग्रेकरपत्ता: डोंबिवली, ठाणे संकेतस्थळ: http://www.instagram.com/doctoranaghaghangrekar पडे दुधाळ चांदणेरात पुनवेची धुंदआसमंत भारूनियाजुई पारिजात कुंद रमे नीरव शांततासाऱ्या रानातून अशीघुमे वारा वेणुनादगाई अंगाईच जशी रात्र अधिक दाटताचिडीचूप दशदिशाचराचर सारे स्तब्धगस्त घालीतसे निशा तोच पडे कानांवरपैंजणांची रुमझुमडुचमळ काळजाचीरानभर दुमदुम लय घेऊन कवेततनु हेलकावे… Continue reading आणि, चंद्र ओशाळतो – डॉ. अनघा घांग्रेकर
Month: June 2021
पाऊस आणि ती – रुपाली जाधव
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक : १३८विषय क्रमांक : ३विषयाचे नाव : पाऊस आणि ती (मुक्तछंद)शब्दांकन : रुपाली जाधव (सायरा)पत्ता : मुंबई संकेतस्थळ :-http://www.instagram.com/jadhav.rupalisara92 मेघ दाटूनी येतातआठवणीत नेतातभांबावते ती जराशीअडखळते काहुरात ती थेंबांशी बोलतेनी ओंजळीत झेलतेपावसाचा निरोप घेतंओली पापणी भारावते सरी बेभान करतातरोमारोमात शहारतातथेंब स्पर्शून देहासअंतरंगी सळसळतात पाऊस खूप बोलतोपाऊस गुज सांगतोचिंब भिजते ती बावरीनी गार… Continue reading पाऊस आणि ती – रुपाली जाधव
मौनाची भाषांतरे – परेश रसिका यशवंत पवार
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३८विषय क्रमांक: ५विषयाचे नाव: मौनाची भाषांतरे (कविता)शब्दांकन: परेश रसिका यशवंत पवारपत्ता: अलिबाग संकेतस्थळ: http://www.facebook.com/paresh.pawar.71 का येते आणिक जातेही तुझी आठवण वेडीये उनाड वार्यासंगेगे तुझी आठवण थोडी सांजेला ऊन उतरताती सोनकेशरी होतेपायात क्षणांची बेडीनिघताना पाउल अडते एकांती हळवी होतेही त्वचा मौन प्राणाचीभलतीच अवस्था आहेया ओघळत्या मेणाची भाषेने मौन मनाच्यामन अविरत जळते आहेतव… Continue reading मौनाची भाषांतरे – परेश रसिका यशवंत पवार
पाऊस आणि ती – परेश रसिका यशवंत पवार
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३८विषय क्रमांक : ३विषय: पाऊस आणि ती शब्दांकन: परेश रसिका यशवंत पवारपत्ता: अलिबाग संकेतस्थळ: http://www.facebook.com/paresh.pawar.71 पाउस म्हटले म्हणजे मगती वेडी अगदी होतेअन् चिंब चिंब होतानाती नाव कागदी होते तो थरथरणारा चाफाअन् ती भिजलेली मातीगाणी त्या ओठांवरलीथेंबात विरघळुन जाती ती खुशाल भिजते आणिकहा जीव कापरा होतोदेहाच्या वळणावरलातो थेंब नाचरा होतो रे दग्ध… Continue reading पाऊस आणि ती – परेश रसिका यशवंत पवार
फिरूनी नवी जन्मेन मी – हर्षदा भंगाळे
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३८विषय क्रमांक: १विषयाचे नाव: फिरूनी नवी जन्मेन मी (कथा) शब्दांकन: हर्षदा भंगाळेपत्ता: बदलापूर, ठाणे संकेतस्थळ: https://instagram.com/harshvichar आज जरा जास्तच थकलेले! दिवसभराच्या थकव्याला नाहीसं करूया म्हंटलं आणि रात्री पडल्या-पडल्या मोबाईलने हातात त्याची जागा बळकावून घेतली. व्हॉट्सॲप बघते न बघते तोवर इंस्टाग्रामचं बोलावणं आलं. म्हणून इथून तिथे अन् तिथून इथे उडी दर ३… Continue reading फिरूनी नवी जन्मेन मी – हर्षदा भंगाळे
फिरुनी नवा जन्मेन मी – वैभव गुरव
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३८विषय क्रमांक: १विषयाचे नाव: फिरुनी नवा जन्मेन मी (कथा) शब्दांकन: वैभव गुरव (सह्यगंधार)पत्ता: जयसिंगपूर( जिल्हा: कोल्हापूर) संकेतस्थळ:http://www.instagram.com/sahyagandhar ।।श्री।। फिरुनी नवा जन्मेन मी 'सत्य हे कल्पनांहून अद्भुत असते' असे म्हणतात. अविश्वसनीय वाटण्याऱ्या गोष्टी सुद्धा सत्य असू शकतात! सजीव म्हणल्यावर जन्म-मृत्यूची फेरी आलीच. असे म्हणतात की व्यक्तीचा जन्म होताना त्याचा मृत्यू विधीलिखित असतो.… Continue reading फिरुनी नवा जन्मेन मी – वैभव गुरव
मौनाची भाषांतरे – सौरभ सावंत
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३८विषय क्रमांक: ५विषयाचे नाव: मौनाची भाषांतरेशब्दांकन: सौरभ सावंतसंकेतस्थळ: https://instagram.com/aashvasthआपला जीवन प्रवास म्हटलं की वेळोवेळी वाटेत येतात ते वळणावळणाचे रस्ते, चढउतारांचे घाट, आणि प्रवासाला अचानक ब्रेक लागेल असे अनेक अडथळे. प्रवासातील ह्या मार्गवरून पुढे जाताना आपल्यावर अनेक असे प्रसंग ओढावतात ज्यातून सुटण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. अनेक लोकांची मदत घ्यावी लागते. वेगवेगळ्या… Continue reading मौनाची भाषांतरे – सौरभ सावंत
पाऊस आणि ती – साक्षी देव
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३८विषय क्रमांक: ३विषयाचे नाव: पाऊस आणि ती (कविता) शब्दांकन: साक्षी देवपत्ता: पुणे संकेतस्थळ:https://instagram.com/sahitya.sahavas जून वेळचा गार वारातिची स्मृती घेऊन भेटतोढग काळोख येता गारवापाऊस अलगद मनात दाटतो पावसाच्या चाहुलीनेतिचेही स्मरण होतेपाऊस आणि ती समीकरणपुन्हा डोळ्यासमोर येते पावसाच्या हजेरिनेतिचीही लगबग असायचीनवीन पुस्तक, नवीन गणवेशसारीच घाई असायची ओढ असायची मनातपुन्हा तिची घंटा ऐकायचीमागच्या बाकावर… Continue reading पाऊस आणि ती – साक्षी देव
फिरुनी नवा जन्मेन मी – श्वेता कुलकर्णी
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३८विषय क्रमांक: ०१विषयाचे नाव: फिरुनी नवा जन्मेन मी (कथा) शब्दांकन: श्वेता कुलकर्णीपत्ता: पुणे संकेतस्थळ: https://www.instagram.com/aabhaasii दमला होता तो खूप हे नश्वर आयुष्य जगून. वाईट माणसं, भिन्न विचार, सततची निराशा ह्या सगळ्या गोष्टींकडे पाहून. रोजचा नवा दिवस आणि दिवसागणिक येणारे अनुभव देखील त्या एकाच पट्टीतले. "जगावं कोणासाठी तर त्या एका माणसासाठी" पण… Continue reading फिरुनी नवा जन्मेन मी – श्वेता कुलकर्णी
आणि काय हवं? – ओमकार भोईर
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३८विषय क्रमांक: २विषयाचे नाव: आणि काय हवं?शब्दांकन: ओमकार भोईरपत्ता: वासिंद, ठाणेसंकेतस्थळ: https://instagram.com/krishn_rang_शीर्षक: मिटला दुरावा (मुक्त)रिमझिम रिमझिम पाऊस निनादत होतादूरवर गेलेली वाट सुद्धा मोकळी होतीवरती आभाळ भरून आलेलेपावसाची प्रत्येक सर मनाला चिंब भिजवत होतीजेंव्हा जेंव्हा असा पाऊस येतो तेंव्हा तेंव्हा सोबतीला प्रश्न आणि उत्तरे ही घेवून येतोयाच हरेक थेंबाद्वारे तोही काही खुणावत… Continue reading आणि काय हवं? – ओमकार भोईर
आणि काय हवं – अतुल दिवाकर
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३८विषय क्रमांक: २विषयाचे नाव: आणि काय हवं (कविता)शब्दांकन: अतुल दिवाकरपत्ता: पुणेसंकेतस्थळ: https://instagram.com/meetakd॥श्री॥आणि काय हवं?विचारात या खर्ची पडले ना आयुष्य सारेसमाधानाचा एक तरी उपाय कोणी द्यारेजे जे आहे ते ते हवेच होते मजला सारेजे जे नाही ते ते माझ्याकडे नाही, का रे?संपत नाही अपेक्षांचा डोंगर उभा समोरउंची त्याची वाढत जाते जीवाला ह्या… Continue reading आणि काय हवं – अतुल दिवाकर
अजुनी रितेच आहे – डॉ. अनघा घांग्रेकर
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३८विषय क्रमांक: ४विषय: अजुनी रितेच आहे (कविता)शब्दांकन: डॉ. अनघा घांग्रेकरपत्ता: डोंबिवली, ठाणेसंकेतस्थळ: http://www.instagram.com/doctoranaghaghangrekar-----------------------------अजुनी रितेच आहेमन हे अबोल माझेमौनात अर्थ पाहेइन्कार करी रमायाअजुनी रितेच आहेनक्षत्रभार अवघाओसंडुनीच वाहेचंद्राविना आभाळअजुनी रितेच आहेसरी ऐल पैल पडतीधरणी सुखावताहेते पात्र मात्र नदीचेअजुनी रितेच आहेभावामधून भक्तीभगवंत शोधताहेहृदयामधील मंदिरअजुनी रितेच आहेघाली नभा गवसणीपिलु पंख पसरु पाहेघरकुलातील गोकुळआता रितेच आहे✍🏻… Continue reading अजुनी रितेच आहे – डॉ. अनघा घांग्रेकर
पाऊस आणि ती – डॉ. अनघा घांग्रेकर
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३८विषय क्रमांक: ३विषय: पाऊस आणि ती (कविता)शब्दांकन: डॉ. अनघा घांग्रेकरपत्ता: डोंबिवली, ठाणेसंकेतस्थळ: http://www.instagram.com/doctoranaghaghangrekarगडद गडद झणी मेघ दाटलेतिमिरांकित बघ व्योम जाहलेधरतीनयनी नीर आटलेअधीर मन जे तिचे दाहलेघालमेल बरसण्या उगाचचवाट सोडीना श्यामल अंबरअवगुंठुन ती कधीची उभीरेखुनी नयनी काजळ सुंदरआला समीप ओलेता क्षणईप्सित मनीचे सफल जाहलेधवलफेनसे तुषार लेऊनहलके हलके झरू लागलेआता सारे बंध झुगारुनवाऱ्यावरती… Continue reading पाऊस आणि ती – डॉ. अनघा घांग्रेकर
मौनाची भाषांतरे – उल्का मानकर
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक : १३८विषय क्रमांक : ५विषय : मौनाची भाषांतरे (कविता)शब्दांकन : उल्का मानकरपत्ता : नाशिककसे करावे सांग सखये मौनाचे या भाषांतरभाषा कुठली, कुठले अक्षर, भासते युगांतरछंद लाविला मज सखे तव अल्लड नेत्रांनीमौन धरले का माझ्यासंगे लाडिक कटाक्षांनीकधी ऊन-सावली अन श्रावणसरींचे बरसणेकसे विसरू तुझे ओले, अवघडून गं लाजणेहितगुज वाऱ्याशी करणारा गर्द केश सांभारघुमतसे… Continue reading मौनाची भाषांतरे – उल्का मानकर
पाऊस आणि ती – साधना करंदीकर
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३८विषय क्रमांक: ०३विषयाचे नाव: पाऊस आणि तीशब्दांकन: साधना करंदीकरभिंती कुडाच्यामाथ्यावर झाप,कुठे सुख शोधावेनाही मोजमाप.पाऊस आणि तीझोपडी नाम्याची,बाळ ,बाळंतीणआत सात दिसाची.आला पाऊस वारा,येती झोपडीत धारायेथे जमीनीत गारवा,भरलाय खूप सारा.बाळासाठी बांधी झोळीबाळ निजले हो शांत,माय अन बापालादाणा पाण्याची हो भ्रांत.विनवी हात जोडूनदया करी देवराया,पडेल झोपडी मोडूनअन गारठेल काया.✍🏻:- साधना करंदीकर.
आणि काय हवं? – जयश्री लंगडे
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक १३८विषय क्रमांक : २विषयाचे नाव: आणि काय हवं? (छंदमुक्त)शब्दांकन: डॉ. जयश्री लंगडेपत्ता:- ठाणेसंकेतस्थळ:- https://www.instagram.com/dr.jayshree_langade/रंग लेखणीचा परिवार वाचायला, चांगले विषय लिहायला, उत्तमोत्तम प्रशासक मंडळ समीक्षणालाआणि काय हवं? नवोदित लेखकाला!एकत्र कुटुंब, प्रेमाच्या भिंती, विश्वासाचा पाया, आपुलकीचे छतआणि काय हवं? घरपणाला!घराचा कोपरा, हातात आवडीचे पुस्तक, कॉफीचा मग सोबतीला,आणि काय हवं? विरंगुळ्याला!निर्भेळ भावनेचे जल, समाधानाची… Continue reading आणि काय हवं? – जयश्री लंगडे
फिरूनी नवी जन्मेन मी – सुखदा मेहेंदळे
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३८विषय क्रमांक: १विषयाचे नाव: फिरूनी नवी जन्मेन मी (कथा) शब्दांकन: सुखदा मेहेंदळेपत्ता: मुंबई संकेतस्थळ:http://www.instagram.com/shabd_krushnarpan ।।श्री।। आटपाट नगरात एक सुंदरसं घरकुल होतं. समुद्रकिनारी असलेल्या त्या घरकुलाला ताडाच्या झाडांचं चिलखत होतं. सूर्याची किरणं रोज सकाळी, संध्याकाळी या घराला प्रकाशाचा अभिषेक घालायला येत. समुद्राच्या लाटा रोज येऊन आपापल्या मनातल्या गुजगोष्टी या घराच्या पायऱ्यांशी करून… Continue reading फिरूनी नवी जन्मेन मी – सुखदा मेहेंदळे
आणि काय हवं! – डॉ. अनघा घांग्रेकर
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३८विषय क्रमांक: २विषय: आणि काय हवं! (कविता)शब्दांकन: डॉ. अनघा घांग्रेकरपत्ता: डोंबिवली, ठाणेसंकेतस्थळ: http://www.instagram.com/doctoranaghaghangrekarमूठभर प्रीतसहवासाकाठीआणि काय हवं!तुझ्या माझ्यासाठी. बहीण भावांतनाही उणंदुणंवात्सल्य मुक्कामी,ना मुळी पाहुणं. देवरूप पाहींमाता पितरांतशोधी ना ईश्वरकधी मंदिरांत. माहेरा सोडूनसासरी रुजलेमी तू पण माझेकेव्हाच बुजले. जिवलग मैत्रजीवा जीव देतीगोतावळा सारापूर्णत्त्वास नेती. हातीपायी धडशाबूत अक्कलना केली कुणाचीआंधळी नक्कल. रंजल्या गांजल्यामदतीचा हातचित्ती… Continue reading आणि काय हवं! – डॉ. अनघा घांग्रेकर
पाऊस आणि ती – प्रतिभा धामणे
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३८विषय क्रमांक: ३विषय: पाऊस आणि तीशब्दांकन: प्रतिभा धामणेनील नभीचे धुसर होताकशी क्षणात काळी चादरघनगर्द अशा राईवरतीआकाशाला तो आला पाझरभिजून हर्षिता हिरवी पानेथरारती ते तांबुस अंकुर टपटपणाऱ्या त्या थेंबांनी तिच्या पायी बांधले नुपुरपाऊस असता सोबतीला प्रसन्न करी तनामनाला रोमांच तिच्या मनी भरूनीहर्ष भिडतसे गगनालातिचे फांदीवर नर्तन चालेवर्षा सर ती थैमान करीचिंब भिजल्या… Continue reading पाऊस आणि ती – प्रतिभा धामणे
पाऊस आणि ती – समृद्धी लंगडे
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३८विषय क्रमांक: ३विषय: पाऊस आणि तीशब्दांकन: समृद्धी लंगडेपत्ता: इस्लामपूर, सांगली संकेतस्थळ : http://instagram.com/shabd_arkशीर्षक:- तिचे नि पावसाचे नातेकोसळत्या धारांनी इवले हात गारठलेकडाडत्या विजांनी इवले डोळे घाबरलेममतेने स्पर्शले मऊशार हात कोवळेतिचे नि पावसाचे उबदार नाते वेगळेखेळकर ती बालिका कागदाची सोडे नावलहानग्या फुलपाखरांचा जणू वसे गाववेड्या त्या जलधारीं ओलसर चिंब सगळेतिचे नि पावसाचे खोडकर… Continue reading पाऊस आणि ती – समृद्धी लंगडे
अजुनी रितेच आहे – शैलेश देशपांडे
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक : १३८विषय क्रमांक: ४विषयाचे नाव: अजुनी रितेच आहे.शब्दांकन : शैलेश देशपांडे.पत्ता: औरंगाबाद.संकेतस्थळ: https://www.instagram.com/shabda.layवृत्त: आनंदकंदलगावली : गागालगा लगागा गागालगा लगागाझोपेत वार व्हावा, होते तसेच आहेमी बांधता किनारी, घर वाहतेच आहे.जडले कसे कळेना, नाते असे तुझ्याशीतू वाट शोधली; मी, होतो तिथेच आहे.मी बांधतो मनाचे, धागे जरी नव्यानेती वीण आठवांची, का फाटतेच आहे.आता अमाप… Continue reading अजुनी रितेच आहे – शैलेश देशपांडे
आणि काय हवं? – विजयश्री तारे जोशी
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक १३८विषय क्रमांक : २विषयाचे नाव: आणि काय हवं? (अभंग)शब्दांकन: विजयश्री तारे जोशीपत्ता: कोल्हापूरसंकेतस्थळ:https://instagram.com/vijayshreetjoshi बालकाचे मज। हसू देगा देवा। सदा मुखी ठेवा। समाधान॥नववधू लाजे। स्मितहास्य ओठी। कढ दाबे पोटी। माहेराचे॥माता पिता धन्य। पुत्र देई हासू। आनंदाचे आसू। नेत्री येत॥सागराचे हासू। उधळते मोती। अव्हेरतो खोटी। माया तुझी॥नभाचे ते हासू। धरती डोलते। आनंदे बोलते।… Continue reading आणि काय हवं? – विजयश्री तारे जोशी
पाऊस आणि ती – वर्षा गायकवाड
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक : १३८विषय क्रमांक : ०३विषयाचे नाव : पाऊस आणि ती शब्दांकन : वर्षा गायकवाड पत्ता : मुंबई संकेतस्थळ :https://www.instagram.com/kavya_rutu/पहिल्या पावसाची पहिली सर येते मनात मृद्गंध ठेवून जातेती बघून हसते अलाहिदाअन मी नुसताच पावसावर फिदाइंद्रधनूचे रंग लेवून ती मोहिनी घालत जातेपावसाच्या प्रत्येक थेंबागणिकमला न्याहाळत जातेसूर्यासमोरचा धूसर पडदा,अवतीभवतीचा कुंद गारवाअंधाराने दाटून आलेलासभोवतीचा परिसर… Continue reading पाऊस आणि ती – वर्षा गायकवाड
अजूनी रितेच आहे – संचिता नितीन गड्डमवार
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३८विषय क्रमांक: ४विषयाचे नाव: अजूनी रितेच आहे (द्रोणकाव्य)शब्दांकन: संचिता नितीन गड्डमवारपत्ता: वलनी (चंद्रपूर)संकेतस्थळ: https://instagram.com/kavyanchitaरितेच आहे अंगण अजूनी रितीच माझी कूस रे कधी होणार मी आई आता विठ्ठला सांग तूच रे लग्ना झाली वर्षे सात, सुख सारे मज लाभले देवा सुख हे एक का तू मजला ना दिधले? गोकुळ कर घराचे हेच… Continue reading अजूनी रितेच आहे – संचिता नितीन गड्डमवार
फिरूनी नवी जन्मेन मी – विजयश्री तारे जोशी
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक:१३८विषय क्रमांक: १विषयाचे नाव: फिरूनी नवी जन्मेन मी शब्दांकन: विजयश्री तारे जोशीपत्ता: कोल्हापूर संकेतस्थळ:https://instagram.com/vijayshreetjoshiअगदी सकाळी सकाळी उत्साही आवाजात प्रिय सखीचा फोन आला, ‘कधी भेटूया? तुझ्याशी खूप बोलायचंय.' माझा क्षणभर विश्वासच बसेना, ही सखी माहेरी आली कधी? खूप दिवसांनी भेट होणार म्हणून इतकी खुष झाले की तिला कधी आलीस विचारायचेही विसरूनच गेले. जेमतेम… Continue reading फिरूनी नवी जन्मेन मी – विजयश्री तारे जोशी
